सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचे काम सबंध राज्यात सुरू असून सध्याचे सरकार विकासासाठी अहोरात्र झटत आहे.त्यांना साथ द्या.महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती आत्मविश्वासाने वावरताना आणि अधिक शक्तिशाली पाहायला मिळेल.तर सरकार महिला सक्षमीकरणाला गती देत असल्याचे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.पुणे ,महिला बालकल्याण विभाग जि.प.पुणे व बारामती हायटेक टेक्सस्टाइल पार्क लि यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुका महिला स्वयंसहाय्यक कौशल्य विकास व क्षमता बांधणीसाठी एकदिवसीय आयोजित कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी भोर येथे सुनेत्रा पवार शुक्रवार दि.१ बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जि. प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,जिल्हा बँक सदस्य भालचंद्र जगताप,माजी उपसभापती विक्रम खुटवड,जिल्हा परिषद माजी सदस्य चंद्रकांत बाठे,शहराध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी बालकल्याण विभाग जामसिंग गिरासे,गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर,सुनील भेलके,तृप्ती खुटवड,विघ्या पांगारे,रेखा टापरे,गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, पल्लवी शिवतरे,शैलजा सावंत,सरपंच निर्मला झांजले,निगडे ,मनोज खोपडे आदींसह अंगणवाडी व बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पवार पुढे म्हणाल्या भोरकरांना आदर,सन्मान,जिव्हाळा आहे,भोरची भूमी पवित्र व समृद्ध आहे.समाजकारनची आवड असल्याने तालुक्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे.विकास रथाचे पाईक होऊन विकास साधूया.