सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
विंझरमध्ये इयत्ता दहावीच्या परिक्षेतील विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.केंद्रसंचालक भगवान बेल्हेकर उपकेंद्रसंचालक
बाजीराव पवार,कोंढाळकर यांच्या हस्ते प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.तर वेल्हे तालुक्यातुन इयत्ता १० वीच्या परिक्षेसाठी तीन केंद्रांवर ६७५ विद्यार्थी परिक्षा देत आहेत. सरस्वती विद्यालय अंबवणे येथे वांगणी,कुरुंगवडी,माळेगाव,हातवे,सोंडे येथील विद्यालयातील एकुण ३२२ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले आहेत.केंद्रसंचालक हनुमंत घनवट,उपकेंद्रसंचालक महादेव बेंद्रे,मधुकर कदम काम पाहत आहेत.तर न्यु इंग्लिश स्कुल विंझर येथे वाजेघर,दापोडे,विद्यालयातील एकुण १६७
विद्यार्थी परिक्षेला बसले असुन केंद्रसंचालक भगवान बेल्हेकर,उपकेंद्रसंचालक बाजीराव पवार आहेत तर तोरणा विद्यालय वेल्हे येथे पासली,निवी येथील विद्यालयातील एकुण १८६ विद्यार्थी परिक्षेस असुन केंद्रसंचालक तानाजी सांगळे,उपकेंद्रसंचालक मोहन किन्हाळे आहेत.तर बैठे पथक कैलास जाधव,रामदास पाटील केंद्रावर आहेत.
तर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे,तहलिलदार निवास ढाणे यांच्या आदेशानुसार भरारी पथकांची नेमणुक केली केली आहे. निवासी नायब तहसिलदार राजश्री भोसले ,अव्वल कारकून तीर्थगिरी गोसावी,पुरवठा निरीक्षक उत्तम आगलावे,लिपिक भानुदास लेंढे यांचा भरारी पथकात समावेश असुन तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर भेट देणार असुन वेल्हे पोलीस स्टेशनकडुन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन खामगळ यांनी तिनही केंद्रांवर भेट देऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे.
COMMENTS