Jawali News l ओंकार साखरे l अंधारी बोगस जमिन खरेदी विक्री प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : चौघांना अटक, २० पर्यंत कोठडी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
गत दोन वर्षापूर्वी अंधारी ता जावली येथिल झालेल्या जमीन खरेदी विक्री दस्त व्यवहारात अनोळखी इसमाद्वारे करण्यात आलेल्या बोग जमिन खरेदी विक्री प्रकरणी चौघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दि २० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली.
          याबाबत मेढा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१६ जुन २०२२ व दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी मौजे अंधारी ता.जावली जि.सातारा येथील श्री. रामचंद्र विठ्ठल शेलार व त्यांचे भाऊ लक्ष्मण रखमाजी शेलार यांचे जमिनीचा खरेदी दस्त त्यांचे ऐवजी दुसरे तोतया इसम उभे करून जमिनीचा खरेदी दस्त दुय्यम निबंधक कार्यालय मेढा येथे करून फसवणूक केलेबाबत  रामचंद्र विठ्ठल शेलार यांनी दिले फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.१०७/२०२३ भा.दं. वि.सं. कलम ४२०,४६५,४६७,४७०,४७१,३४ प्रमाणे दि.२२/६/२०२३ रोजी प्रथमतः दोन आरोपी यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आलेला होता. गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीकडे केले चौकशीमध्ये आणखी १० आरोपींची नावे निष्पन्न करणेत आलेली आहे. परंतु जमिनीचे मुळ मालक (फिर्यादी व साक्षीदार यांचे ऐवजी बनावट खरेदी दस्त करतेवेळी उभ्या केलेल्या तोतया इसमांची माहीती मिळून येत नव्हती. परंतु तद्नंतर दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर तोतया इसमापैकी एक इसम संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झालेने त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस करून इतर आरोपींची नावे निष्पन्न केली. त्याप्रमाणे सदर आरोपी व यापूर्वी निष्पन्न झालेले आरोपी १) रविंद्र पांडूरंग शेलार रा. अंधारी ता.जावली २) संतोष बंडू सावंत रा. उंबरेवाडी पोस्ट अंधारी ता. जावली, ३) विजय सदाशिव कदम रा.आपटी ता.जावली ४) संपत हरिबा कदम रा. आपटी ता. जावली यांना दि. १४/०२/२०२४ रोजी २१.५४ वाजता अटक करणेत आली असून त्यांची दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. संतोष तासगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
           सदरची कारवाई ही समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली केली असून सदर कारवाईमध्ये संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे, विकास गंगावणे सहा. पो. फौजदार, पो.कॉ. सनी काळे ब.नं.२५२६ यांनी सहभाग घेतलेला आहे.
To Top