सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे ता. बारामती येथे आज रात्री एक वाजता लांडग्यांनी मेंढ्याच्या तळावर हल्ला करत नऊ मेंढ्या फास्ट केल्या. याप्रकरणी आज बारामती तालुका वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला असून मेंढपाळाला नुकसान भरपाईची आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे एक वाजता लांडग्यांच्या टोळीने आज रात्री एक वाजता करंजे गावातील भाऊसाहेब खंडू लकडे यांच्या शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या तळावर लांडग्यांच्या टोळीने हल्ला चढवत मालक येईपर्यंत अनेक मेंढ्यांच्या नरडीचा घोट लांडग्यांच्या घेतला होता. आज सकाळी वनविभागाच्या वनरक्षक माया काळे व नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी याठिकाणी सहा मेंढ्यांचे शव आढळून आले. त्यामुळे काळे यांनी सहा मेंढ्यांचा पंचनामा केला आहे. मेंढ्पाळ सोमनाथ दादा महानवर यांनी माझ्या नऊ मेंढ्या मेल्या असून ६३ हजारांचे नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. तर वनरक्षक माया काळे यांनी घटनास्थळी सहा मेंढ्या आढळल्या याबाबत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
COMMENTS