सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अनेक वर्षांनी माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार,(उबाठा) शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शनिवार दि.९ पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्र येथे भोर- वेल्हा तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळाव्या प्रसंगी उपस्थित राहणार आसल्याची माहिती पत्रकार परिषदेत गुरुवार दि.७ आमदार संग्राम थोपटें सह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शेतकरी, कार्यकर्ते व महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांची अनेक वर्षानंतर भोर तालुक्यात तोफ धडाडणार असल्याने शरदचंद्र पवार काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भोर काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,वेल्हा अध्यक्ष नाना राऊत, शिवसेना भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,वेल्हा तालुकाध्यक्ष दीपक दामगुडे, राष्ट्रवादी शरद पवार गट भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, वेल्हा अध्यक्ष दीपक रेणुसे, पोपटराव सुके, आदित्य बोरगे ,दिनकर धरपाळे, लहूनाना शेलार ,शंकर वरखडे, धनंजय बुरुख ,विठ्ठल वाडकर ,शिवाजी वाडकर, नारायण कोंडे, ज्ञानेश्वर पांगारे ,निखिल डिंबळे, सुधीर खोपडे,अरविंद सोंडकर उपस्थित होते
आमदार थोपटे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले महाविकास आघाडीची पहिल्यांदाच भोर तालुक्यात सभा होत असल्याने तालुक्यातील शेतकरी तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तर जनता मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भोर विधानसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचनार आहे.
COMMENTS