सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध्य शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थ विक्री करणारे, अवैध्य वाळू व्यवसाय करणारे, अवैद्य दारु विक्री करणारे तसेच धोकादायक व्यक्तीविरुद्ध पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करत असताना पुणे ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अवैध्य दारुची निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करणारे दारुवाले यांची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी तसेच अवैध्य दारुचे निर्मितीच्या व्यवसायाचा सूळ नायनाट करण्यासाठी अवैध्य दारुचा व्यवसाय करणारे हातभट्टीवाले यांचेविरुद्ध कारवाईचा बडगा उगारुन त्यांना एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलीसांना दिले होते.
त्यावरुन बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमधील सुहासनगर आमराई बारामती येथे वास्तव्यास असलेल्या हातभट्टीवाला मंगेश बबन लोंढे वय ३६ वर्षे रा. सुहासनगर आमराई बारामती ता. बारामती जि. पुणे योचविरुद्ध यापुर्वी अवैध्यरित्या चोरुन गावठी हातभट्टीची विषारी दारु गाळणे, त्याची विक्री करणे, दारुचे गुत्ते चालविणे यासारचो गुन्हे दाखल हाते. तो सराईत हातभट्टीवाला असल्याने तसेच त्याची दहशत बारामती शहर व ग्रामीण परिसारात असल्याने त्याचेवर एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कार्यवाही होणेबाबत दिनेश तायडे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी मा. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन मा. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक यांनी तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे डॉ. सुहास दिवसे यांनी मंगेश बबन लोंढे वय ३६ वर्षे रा. सुहासनगर आमराई बारामती ता. बारामती जि. पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्यकलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती ( व्हिडीओ पायरेटस) वाळू तस्कर व जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन १९८१ ( सुधारणा २०१५) अन्वये १ वर्षाकरीता त्यांचे कार्यालयाकडील आदेश जा.क्र. पगम/एमपीडीए /एसआर/ ०१/०१/२०२४ ता. ०५/०३/२०२४ अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे डॉ. सुहास दिवसे साो. यांचे स्थानबद्धतेचे आदेशान्वये मंगेश बबन लोंढे वय ३६ वर्षे रा. सुहासनगर आमराई बारामती ता. बारामती जि. पुणे यांस बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस कॉन्स्टेबल सागर जामदार यांनी शोध घेवून त्यास आज ता. ०६/०३/२०२४ रोजी ताब्यात घेवून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे जमा करुन एक वर्षाकरीता स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), संजय जाधव (अपर पोलीस अधिक्षक बारामती) सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती), यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर ( पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण), दिनेश तायडे (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन), युवराज घोडके (पोलीस उपनिरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) पोलीस अंमलदार महेश बनकर, रामदास बाबर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण), पोलीस अंमलदार सागर जामदार, अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, अक्षय सिताप, दशरथ इंगोले, दादा जाधव, शाहू राणे ( बारामती शहर पोलीस स्टेशन) यांनी केलेली आहे.
COMMENTS