सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये अजित पवार यांनी परवा झालेल्या जाहीरसभेत ‘सोमेश्वर मध्ये १०० बेडचे हॉस्पिटल करणार’ असे सांगितले होते.तो शब्द अजित पवार यांनी एकाच दिवसात पूर्ण करत हॉस्पिटल मंजूर करत त्यास ७७.७९ कोटी निधी सुद्धा मंजूर केला.
सोमेश्वरनगर येथे वाघळवाडीत १०० बेडचे हॉस्पिटल करणार असे सभेत सांगितले होते. त्याला एक दिवस होत नाही तोच दुसऱ्या दिवशी त्यांच्या कामाच्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या संस्थेच्या अधिनस्त १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) ता बारामती येथे स्थापन करण्याबाबत प्रशासकिय मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर त्यास ७७.७९ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकीय प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सोमेश्वरमध्ये कालच्या गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली या दरम्यान त्यांनी वरील हॉस्पिटल करणार असल्याचे जाहीर सागितले होते.याबाबत सोमेश्वरचे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप याना आदल्या दिवशी रात्रीच्या ११ वाजता आपल्याला हॉस्पिटल करायचे असून त्याला जागा उपलब्ध होईल का याची माहिती घेतली होती.जागेची उपलब्धा कळवल्यानंतर अजित पवार यांनी तत्काळ चक्र फिरवत हॉस्पिटलच्या मंजुरीबाबत आदेश दिले. सगळी यंत्रणा कामाला लावत एकाच दिवसात १०० बेडच्या हॉस्पिटला मंजुरी दिली.
सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून मोठे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न होते.ते अजितदादाच्या माध्यमातून आता १०० बेडचे शासकीय रुग्णालय मंजूर केल्याने ते स्वप्न पूर्णत्वास गेले आहे.
सोमेश्वरनगर भागात हॉस्पिटलची गरज होती.अजितदादांनी ती गरज ओळखून हॉस्पिटल एकाच दिवसात मंजूर केले आहे.या भागातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्र्न हॉस्पिटलमुळे कायमचा मिटणार आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.
----------------
सोमेश्वरनगर परिसरातील आणि वाघळवाडीतील नागरिकांच्याच्यासाठी १०० बेडचे हॉस्पिटल मंजूर केल्याने ही गावच्या विकासातील इतिहासात नोंद होणारी बाब असून दादांनी परवा हॉस्पिटल करणार सांगितल आणि काल मंजूर पण करुन दाखवल.यापूर्वी अजितदादांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा मंजूर करून त्यास ४.३७ कोटी निधी पण मंजूर केला होता. दादांचे हॉस्पिटल मंजूर केल्याबद्दल वाघळवाडी करांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो.
अँड.हेमंत गायकवाड, सरपंच ग्रामपंचायत वाघळवाडी-सोमेश्वरनगर