सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : मनोहर तावरे
संपूर्ण देशात एक महत्त्वाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या बारामती येथे कार्यरत गटशिक्षणाधिकारी 'केअरलेस'असल्याचे वृत्त नुकतेच प्रसारित करण्यात आले. सोमेश्वर रिपोर्टरच्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ गटशिक्षणाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. यांच्या जागी नव्याने पुरंदर येथील गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
बारामतीच्या शिक्षण विभागात मनमानी कारभारामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्या विषयी नाराजी होती. समोरच्या व्यक्तीच कुठलेही म्हणणे ऐकून न घेता स्वतःचे मत व विचारसमोर्चांवर लादण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. परंतु अनेक जण कारवाईच्या भीतीपोटी तक्रार करीत नव्हते. याबाबत सोमेश्वर रिपोर्टरने वृत्त प्रसिद्ध करतात याची गंभीर दखल घेतली आहे. शासनाने तत्काळ गटशिक्षणाधिकारी यांची बदली करून नव्याने पुरंदर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची 'बारामती' येथे बदली केली आहे.