सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे.
नीरा-मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती नजीक रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे.
प्रशांत अशोक निगडे वय ४० रा. कर्नलवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. निगडे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ४३ के १३४३ वरून कर्नलवाडी येथून निरेकडे निघाले असता निरा डाव्या कालव्या शेजारी जगताप वस्ती नजीक निरा डाव्या कालव्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये गंभीररित्या जखमी झाले. धडक दिलेली गाडी दुचाकी स्वराला जखमी अवस्थेत सोडून निघून गेली शेजारील ग्रामस्थांनी तातडीने हालचाल करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पाठीमागे दोन मुली असून या झालेल्या दुर्दैवी घटनेने कर्नलवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.