सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ( ता. बारामती) येथील अॅड. नवनाथ नारायण भोसले यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बारामतीतील राष्ट्रवादी भवन मध्ये भोसले यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, जय पाटील, राहुल वाबळे, अमोल कावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नवनाथ भोसले यांनी या अगोदर वाणेवाडीचे उपसरपंच तसेच हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले आहे. विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर भोसले यांनी सांगितले.