सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ( ता. बारामती) येथील हरिष बाळासाहेब गायकवाड यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बारामतीतील राष्ट्रवादी भवन मध्ये गायकवाड यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, जय पाटील, राहुल वाबळे, अमोल कावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS