सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील एका घरात दि.२० रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वेताळपेठ येथील सुधीर ऊर्फ नंदकुमार रमेश रोकडे यांच्या घरात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा भडका उडून झालेल्या दुर्घटनेत सुधीर उर्फ नंदकुमार रोकडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांची पत्नी व मुलगा या घटनेत भाजून गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील वेताळपेठ या ठिकाणी दि. २० रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक घरगुती सिलेंडरचा भडका उडाल्याने सुधीर ऊर्फ नंदकुमार रमेश रोकडे वय ५३ , पत्नी दिपाली सुधीर रोकडे वय ४९ व मुलगा अथर्व सुधीर रोकडे वय २१ हे एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले. यातील सुधीर रोकडे व त्यांची पत्नी दिपाली हे दांपत्यास अधिक जखमी असल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर मुलागा अथर्व यास लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुणे येथे उपचार चालू असताना गंभीर जखमी सुधीर रोकडे यांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. लोणंद पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद अद्याप झाली नसल्याचे समजत आहे.