सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पार्टीच्या
बारामती तालुका सोशल मीडिया या संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रदीप (दादु) भगवान मांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मांगडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
काल दि. २० रोजी वाघळवाडी येथे युगेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदीप मागडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. गावच्या वतीने सत्कार सुध्दा करण्यात आला. यावेळी adv. तालुकाध्यक्ष एस एन जगताप, जि. प. माजी अध्यक्ष सतीश खोमणे, औद्योगिक सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप,
किरण गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सुधीर गायकवाड, प्रदीप शेंडकर, प्रशांत बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS