जावली l आंबेघर येथे पाला पाचोळा जाळण्याने पेटला डोंगर : वन विभागाकडून गुन्हा दाखल, एकजण ताब्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
आंबेघर ता. जावली येथिल रमेश राजाराम शेलार यांनी शेतातील पालापाचोळा जाळण्याचा प्रयत्न करीत असताना आगीचा  भडका उडून आग आटोक्यात न आल्याने डोंगराला आग लागुन डोंगर जळून गेल्याने रमेश शेलार यांच्यावर वन विभागाकडून गुन्हा दाखल होवून प्रथम वर्ग न्यायाधिशांनी एक हजार रुपये दंड व नुकसास प्रकरणी चार हजार दंड सुनावला आहे.
           याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा वन विभाग सातारा अंतर्गत वनपरिक्षेत्र मेढा मौजे आंबेघर, ता. जावली, जि. सातारा मधील वनक्षेत्रात दि. १५ मार्च रोजी वणवा लागला असता, वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी जागेवर जाऊन वणवा विझविला. याबाबत वन गुन्हा नोंद करणेत आला होता. सदर गुन्ह्याचा तपास केला असता सदरचा वणवा हा रमेश राजाराम शेलार, वय 37 वर्षे, रा. आंबेघर त. मेढा यांनी स्वतःचे मालकी क्षेत्रात शेतातील पालापाचोळा जाळला असता सदरची आग जोराच्या वा-याने पसरून जाऊन लगतच असलेल्या आंबेघर फॉ. कं.न.282 वनक्षेत्रात गेली असल्यामुळे वनक्षेत्र जळाले होते.
          याबाबत रमेश राजाराम शेलार, वय 37 वर्षे, रा. आंबेघर तर्फ मेढा यांना दि. 20 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपीने गुन्हा कबुल केल्याने न्यायालयाने आरोपीस रूपये एक हजार इतका दंड सुनावला असून नुकसानीसाठी रूपये चार हजार इतका असे एकूण पाच हजार रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास 15 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. 
          सदरची कारवाई  उपवनसंरक्षक आदिती भारव्दाज मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) महेश झांझुर्णे, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, वनपाल मेढा आर.एस.शेख, वनरक्षक एस.डी. चौगुले, व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी केली. वनक्षेत्रात कोणीही वणवा लावून निसर्गाचे, वन्य प्राणी-पक्ष्यांचे नुकसान करु नये असे वन विभागाकडून आवाहन करणेत येत आहे.
To Top