जावली l वाढीव घरपट्टीच्या विरोधात नागरिकांची मेढा बंदची हाक : नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात घंटानाद अंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा नगरपंचायतीस वाढीव घरपट्टी आकारणीस शासनाकडून दि २० फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार स्थगिती मिळालेली असताना मनमानीपणे मिळकतदारांना नगरपचायती कडून अवास्तव कर आकारणीची नोटीस बजावून कराची सत्कीने वसूली सुरु असल्याच्या कारणाने मेढा नागरीकांच्यावतीने उद्या दि. १३ रोजी मेढा बंद ठेवण्यात येवून घंटानाद अंदोलन करण्यात येणार असल्याचे भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे . याबाबतचे निवेदन ग्रामस्याच्या वतीने नगरपंचायत व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
To Top