सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. चे दरम्यान बोपेगाव ता. वाई गावचे हद्दितील हॉटेल कोहीनूर येथे ट्रॅव्हल्स नं. एमपी / ०९ / डीडी / ९९५४ ही थांबलेली असताना फिर्यादी जेवण करणेसाठी हॉटेलमधे गेले त्यादरम्यान सदर ट्रॅव्हल्सचे सीट नंबर २५ एल वर ठेवलेले लगेज बॅग मधील फिर्यादीचे ताब्यातील ९६ लाख रुपये सदर ट्रॅव्हल्स मधे प्रवास करणारे दोन अनोळखी प्रवाशांनी चोरुन नेले होते.
सदर गुन्हयात चोरीस गेलेली रक्कम मोठी असल्याने समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे सदर चोरीचा गुन्हा घडकीस आणणे करीता सपोनि रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईज चे एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने घटनास्थळचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये २ संशयित इसमांच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्या. त्या अनुषंगाने
तांत्रिक विश्लेषनावरुन एक संशयित आरोपी हा नवी दिल्ली येथे व दुसरा उत्तरप्रदेश येथे चोरी केल्यानंतर गेल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली भुईज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नवी दिल्ली येथे आरोपीचा शोध घेणेकरीता रवाना झाले. दरम्यान पोलीस पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सदर आरोपी हा दिल्ली येथून उत्तर प्रदेशला निघून जात असलेचे समजले, त्याप्रमाणे त्याचा दिल्ली येथून सुमारे ६०० किलोमीटर पाठलाग करत त्याला त्याचे गाव भवानीगड, रायबरेली जिल्हा, राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात
घेतले. त्याला विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्वक तपास करुन गुन्हयातील चोरीस गेलेली ८३ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
त्यानंतर त्याचेकडे विचारपुस करुन गुन्हयातील दुस-या आरोपीचा शोध घेवून त्यालाही पडरिया, महाराजगंज रायबरेली जिल्हा, राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. गुन्हयातील तीसरा आरोपी सदर ट्रॅव्हल्सचा क्लिनर याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे गुन्हयातील दोन अनोळखी आरोपींना निष्पन्न करुन त्यांना परराज्यातुन अटक करुन त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ८३ लाख रोख रक्कम हस्तगत करण्यात भुईज पोलीसांना यश मिळाले आहे.