सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी भागातील वरवडी खुर्द ता.भोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील किलोमीटर वरून येणाऱ्या विद्यार्थिनींना स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था, पुणे यांच्याकडून सामाजिक उपक्रमांतर्गत सायकल वाटप करण्यात आले.
संस्था सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अनेक
सामाजिक उपक्रम राबवत असते.एक दुर्गम भागातून
दोन - तीन किलोमीटर शाळेत चालत येणाऱ्या ८ मुलीकरिता सायकल वाटप उपक्रप वरोडी खुर्द शाळेत घेण्यात आला.संस्थेअंतर्गत पासवर्ड या त्रैमासिक अंकाचे वाटप करण्यात आले.तर विद्यार्थ्यांचे वाचन घेण्यात आले.यावेळी वरोडी खुर्द
शाळेतील मुलांनी तयार केलेल्या कवितांचा अंक " अंकुर " या संस्थेला भेट म्हणून देण्यात आला.यावेळी संस्थेचे विना कामतकर, विजय मते,राजू कौजलगी, सुधीर देवधर,संजय पवार,बापू जेधे,अनिल महांगरे,अमर क्षीरसागर उपस्थित होते.