सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Satara Breaking l स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींकडून तब्बल बावीस लाखांचा अफू केला हस्तगत : फलटण तालुक्यातील सासवड आणि कोरेगाव तालुक्यातील देऊर येथून मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झणझणे सासवड येथे तर वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत देऊर येथे अफूची झाडे लावलेल्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांच्याकडून बावीस लाख त्र्याऐंशी लाख रूपये किमतीच्या अफूची झाडे हस्तगत केली.

दि.०४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सासवड (झणझणे) ता. फलटण जि.सातारा येथील दीपक आबा झणझणे वय ४५ रा सासवड(झणझणे )ता फलटण जि सातारा याने पट्टीचा मळा नावचे शेतात तसेच देऊर ता. कोरेगाव जि. सातारा येथील मधुकर शिवाजी कदम वय ५७ वर्ष रा देऊर ता कोरेगाव जि सातारा  याने जातेखन नावचे शिवारातील शेतामध्ये हा स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी अफु या अंमली पदार्थाचे झाडांची लागवड करुन त्यांची जोपासना करीत आहेत . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकाने देऊर ता. कोरेगाव येथे जाऊन मिळाले बातमीतील इसमास ताब्यात घेऊन त्याचे शेतातुन ४,६६,९००/- रुपये किंमतीची २३.३४५ कि.ग्रॅम अंमली पदार्थ अफु झाडे हस्तगत करुन त्यांचेविरुध्द बाठार पोलीस ठाणे गु.र.नं. ५४/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), १८ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच सपोनि रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे पथकाने सासवड (झणझणे) ता. फलटण येथे जाऊन लोणंद पोलीस ठाणेकडील सपोनि सुशिल भोसले व अंमलदार यांचे मदतीने नमुद इसमास ताब्यात घेऊन त्यांचे शेतातुन १८,१६,५८०/- रुपये किंमतीची ९०.८२९ किलो ग्रॅम अंमली पदार्थ अफु झाडे हस्तगत करुन त्यांचेविरुध्द लोणंद पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), १८ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर दोन्ही कारवाई मध्ये एकुण २२,८३,४००/- किंमतीची ११४.१७४ कि. ग्रॅम वजनाची अंमली पदार्थ अफुची झाडे जप्त केली आहेत.

सदर कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, सपोनि सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल कदम, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, मुनीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमोल माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, प्रविण कांबळे, मोहन पवार, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, रोहित निकम, पृथ्वी जाधव, सचिन ससाणे, प्रविण पवार, केतन शिंदे, वैभव सावंत, धीरज महाडीक, अमोल जाधव, अमोल निकम, तसेच लोणंद पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार नितीन भोसले, अतुल कुंभार, सतिश दडस, बापुराव मदने, संजय चव्हाण यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Satara Breaking l स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींकडून तब्बल बावीस लाखांचा अफू केला हस्तगत : फलटण तालुक्यातील सासवड आणि कोरेगाव तालुक्यातील देऊर येथून मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त
Satara Breaking l स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींकडून तब्बल बावीस लाखांचा अफू केला हस्तगत : फलटण तालुक्यातील सासवड आणि कोरेगाव तालुक्यातील देऊर येथून मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjC9Hupva0YKkyONlBxb0y8t6FdEf39DID3Dhx0boLisy6NlFQkckStbt9eAtUo6p6hmNJTuPUpNrUcpq4R10iFkwF7ZyMn1tLWPtOXAidIs70Or5B-7YPiIqjlWCcEXFwYe2TOGsu46bGtsqfBItVrJ44kOfFc_EMOAZpglm9s4QYwsxzO7ycB6GPnA0VD
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjC9Hupva0YKkyONlBxb0y8t6FdEf39DID3Dhx0boLisy6NlFQkckStbt9eAtUo6p6hmNJTuPUpNrUcpq4R10iFkwF7ZyMn1tLWPtOXAidIs70Or5B-7YPiIqjlWCcEXFwYe2TOGsu46bGtsqfBItVrJ44kOfFc_EMOAZpglm9s4QYwsxzO7ycB6GPnA0VD=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/03/satara-breaking-l_5.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/03/satara-breaking-l_5.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy