सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेल्या १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटर सायकल वाई पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हस्तगत केल्या.
सदर दुचाकी वाहन चोरी करणारा संशयित इसम हा वाई एमआयडीसी मधील सुप्रीम बियर बार याठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना प्राप्त झाल्याने, त्यांनी वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना सदरच्या संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्याने, वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांनी वाई एमआयडीसीमधील सुप्रीम बियर बारचे परिसरात सापळा रचुन, संशयित इसम नामे आदेश लालसिंग धनावडे यांस ताब्यात घेतले व त्याच्याकडे अधिकची विचारपुस करता, त्याने दिनांक १६/०३/२०२४ रोजी सुलतानपुर ता वाई जि सातारा येथुन लाल काळ्या रंगाचे डिस्कव्हर वाहन क्र एमएच ११ बीएन ७७६८ ही चोरुन नेहल्याची कबुली दिली तसेच यापुर्वी मच्छी मार्केट वाई येथुन अॅक्टीव्हा वाहन क्र एमएच १२ एफएस ११८९ ही व मांढरदेव ता वाई जि सातारा येथुन एचएफ डिलक्स वाहन क्र एमएच ११ सीझेड ३५१८ ही वाहने चोरुन नेहल्याचे सांगितले. सदबाबत वाई पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत. अशी एकुण १ लाख ८० हजार रुपये किंमतीची तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, वैभव पवार सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार मदन वरखडे, अरुण पाटणकर, उमेश गहीण, अजित जाधव पो.ना कुंभार, पो. शि राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे यांनी केली आहे.