सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
निरा-मोरगाव रस्त्यावर मोढवे गावाच्या नजीक एका चारचाकी गाडीने दुचाकी गाडीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात आरती प्रकाश खोमणे वय १६ रा. खोमणेवस्ती-मोढवे ता.बारामती हीचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, क्रेटा एम एच ४५ एक्यू ४५५० ही निरेच्या दिशेने मोरगाव कडे निघाली असताना मोढवे येथे वळणावर आरती खोमणे ही आपली एम एच ४२ वाय ३६३८ या दुचाकीवरून जात असताना तिच्या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत आरती ही गंभीररित्या जखमी झाली होती.तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास करंजेपुल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार अमोल भोसले करत आहेत.
COMMENTS