सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
आदर्की तालुका फलटण गावाच्या हद्दीत चिंचेचा मळा शिवारात दि २ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेतातील बांधावरून बोरवेलची मशीन व पिकप जीप नेवून बांध खराब केल्याच्या रागातून संशयित सयाजी शंकर निंबाळकर रा आदर्की खुर्द तालुका फलटण याने चंद्रशेखर बबनराव निंबाळकर वय ४८ रा आदर्की खुर्द यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली घटना घडल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत संशयिताला लोणंद पोलिसांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा व ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली संशयताला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्यासमोर हजर केले असता सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे गुन्ह्याची फिर्याद मयत चंद्रशेखर निंबाळकर यांचा मुलगा चैतन्य निंबाळकर यानी लोणंद पोलीस स्थानकात दिली असून पुढील तपास स पो नि सुशील भोसले करीत आहेत