सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
बारामतीच्या अनेक गावात माध्यमिक शिक्षणाचा पुरताच बोजवारा उडाला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मोरगाव नजीक आंबी बुद्रुक या गावातून काल समोर आलाय. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम न शिकवल्यामुळे प्रश्नपत्रिकेत आलेले तब्बल 12 प्रश्न ‘एका’ शिक्षक महाशयांनी परस्परच बदलून दिलेत. सतत वादग्रस्त ठरणाऱ्या या शिक्षकावर त्वरित कारवाई करा अशी मागणी आहे.
तुम्ही पालक असाल तर ? तुम्हालाही हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण ? ही शाळा कुठे डोंगर भागात किंवा आदिवासी गावातील नाही. प्रगतीच्या नावाने डंका पेटणाऱ्या बारामती तालुक्यातच आहे. शिक्षण विभागात चालणाऱ्या अनागोंदी कामाचा हा एक 'नमुना' आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सर्वसामान्य गरिबांचे विद्यार्थी येथे शिकतात. परंतु त्यांना शिकवणारे शिक्षक किती दर्जेदार आहेत हे या घटनेवरून समोर आले.
काही प्रतिष्ठित पुढारी व गावातील काही निवडक लोकांची हुजरेगिरी करीत हा शिक्षक गावालाच डोजर झालाय. गेली काही महिन्यांपूर्वी एका शालेय विद्यार्थ्याला गंभीर दुखापत केल्याच्या कारणावरून हेच वहासे चर्चेत आले होते.या शाळेत सध्या वार्षिक परीक्षा सुरू होती. यावेळी सातवी वर्गातील विज्ञान पेपर ला अभ्यासक्रम शिकवला नसलेलेच प्रश्न आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांकडे केली. यावेळी आपलंच पितळ उघडं पडेल या उद्देशाने शिक्षक महाशयांनी परस्पर तब्बल 11 प्रश्न शिक्षण संस्थेच्या परवानगीशिवाय परस्परच बदलून टाकले.
याबाबत माहिती मिळताच शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांनी शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती माहिती घेतली यावेळी ही गंभीर बाब समोर आली आहे. काही बेजबाबदार शिक्षकांमुळे शिक्षण संस्था बदनाम होत आहे. संबंधित शिक्षकावर तत्काळ कारवाई करा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
---------------------------
दिवाळीनंतर शिक्षण विभागाने, सरकारने विद्यालयीन शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवूच द्यायचे नाही असा पण केल्याप्रमाणे शाळाबाह्य कामात गुंतवून ठेवले. या काळात शाळा सोडून निरक्षर लोकांचा सर्व्हे करण्यात, त्यांच्या परीक्षा घेऊन ऑनलाइन महित्या भरण्यात ते अडकले. मराठा आरक्षण सर्व्हे सुद्धा यांनी केला. निवडणूक कामासाठी मतदान याद्या अपडेट करणे, नावनोंदणी करणे हीही कामे केली. सरकार कडून शिक्षकांना आठवड्याचे ट्रेनिंग देण्यात आले त्यात महिनाभर शाळा विस्कळीत राहिल्या. याशिवाय मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेचीही भर पडली. यावर कहर म्हणजे गणित, हिंदी, मराठी या विषयाच्या दोन दोन परीक्षा घ्यायला लावल्या. शाळांचे शिक्षणाच्या तासिका, गॅदरिंग, क्रीडा स्पर्धा या सगळ्यांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
COMMENTS