सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणावळा : श्रावणी कामत
लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक
सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी
लावुन त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडुन अश्लिल हावभाव करुन नाच करायला लावत आहेत
अशी गोपणीय बातमी सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणवळा विभाग
यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी व लोणावळा शहर पोलीस
स्टेशन यांचेकडील पोलीस स्टाफ यांची संयुक्त टिम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने
सदर ठिकाणी एस ४ नावाच्या बंगल्यावर छापा टाकुन अश्लिल हावभाव करुन साऊंड सिस्टम
लावुन मोठमोठ्याने गाणी लावुन नाच करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या एकुण ९
जणांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांचेवर लोणावळा शहर पोलीस
स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी
त्यांचेकडील बंगला भाड्याने देताना त्यांचे बंगल्या मध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत
याची दक्षता घेतील व बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करतील अन्यथा
त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मा. श्री. सत्यसाई कार्तिक
सहा. पोलीस अधिक्षक सो लोणावळा विभाग व सुहास जगताप पोलीस निरीक्षक लोणावळा शहर
पोलीस स्टेशन यांचेकडुन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे लोणावळा शहरातील भाड्याने दिले
जाणा-या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडुन
करण्यात येत आहे तरी ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी
संपर्क साधुन आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये
व मा. अपर पोलीस अधिक्षक साो श्री. रमेश चोपडे, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री. सत्यासाई
कार्तिक साो लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप लोणावळा
शहर पोलीस स्टेशन यांचे सुचना नुसार पोसई श्रीकांत जोशी, पोहवा / आबनावे, पोना/शिंदे, पोशि/
सोनवणे मपोशि/निंबाळकर, पोशि/ ९० शिंदे, पोशि/ येळवंडे चापोहवा / घोंगडे, चापोना / पवार यांनी केली
असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीकांत जोशी हे करीत आहेत.