Rajgad News l मिनल कांबळे l मौज..मस्ती..आणि धम्माल...अडवली मध्ये यात्रेनिमित्त होम थैली मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील अडवली येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला, शिवार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला,
भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अडवली येथे करण्यात आले होते, यात्रेच्या पहिल्या दिवशी पालखीचे आयोजन करण्यात आले होते, ढोल ताशाच्या गजरात पालखी म्हणून काढण्यात आली, रात्री ढोल ताशांच्या स्पर्धा घेण्यात आल्या दुसऱ्या दिवशी दिवसभर मनोरंजन साठी विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर रात्री महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला शिवार फाउंडेशनचे  गोपाळ इंगुळकर
 यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी स्पष्टपणे हजेरी लावली होती, तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला होता होम मिनिस्टर मधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले, होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये महिलांना बक्षीस वितरण झाल्यानंतर महिलांनी आनंद व्यक्त केला
To Top