वाई l घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल साडेनऊ लाखांचे सोने केले लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील सुरुर येथील राहत्या घरातून ९ लाख ४० हजार. सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने केली चोरी या प्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.२७/३/२४ रोजी १ वा. सुमारास ते ५/४/२४ रोजी ८ वा. दरम्यान सुरूर गावच्या हद्दीतील होळी चौक येथील विद्या चव्हाण फिर्यादी यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उघडून लोखंडी कपाटातील ९,४०,०००/- रू किमतीचे २४ तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत म्हणून त्या अज्ञात चोरट्याचा विरोधात भुईंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास सपोनी रमेश गर्जे करत आहेत
To Top