Bhor News l भोर-आंबाडे मार्गावर नेरेतील एकास मारहाण : बालवडीतील ९ जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-आंबाडे मार्गावर मागील आठ दिवसांपूर्वी नेरे ता.भोर एका तरुणाने स्मशानभूमीत अग्नी दिलेल्या बुजुर्ग आजीच्या मयताची विटंबना केली होती.यावेळी आजीच्या मैताची विटंबना करणाऱ्या तरुणाला बालवडी ता.भोर येथील जमावाने मारहाण केल्याप्रकरणी बालवडीतील ९ जणांवर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याची फिर्याद प्रकाश सदूभाऊ बढे (नेरे )यांनी भोर पोलिसात दिली.
    भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर - आंबाडे मार्गावर रविवार दि.२४ मार्च यावेळी यातील आरोपी यांनी तु आमचे आज्जीचे जळते प्रेत सरणावरून काढुन त्याची विटंबना का केली म्हणुन फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.फिर्यादी हे आरोपींना म्हणाले मला मारहाण करू नका.मी कोणत्याही प्रकारची विटंबना केलेली नाही.मी माझे कामाचे ठिकाणावरून इतरत्र कोठेही गेलेलो नाही.माझे ऐकुण घ्या अशी विनंती करीत असताना ३ आरोपींनी फिर्यादी याला हातातील लाकडी काठी, पीव्हीसी पाईप,लोखंडी रॉडने तर ६ जणांनी शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्कयांनी मारहान केली.तसेच आरोपींनी फिर्यादी यांचे शेतातील घर व घरापाठीमागील भात्यानाची गंज पेटवुन दिली. शेतघराच्या भिंती पाडल्या .आगीत घरातील फ्रिज ,भांडी ,लाकडी टेबल ,प्लॉस्टीकचे खुर्च्या,भांडयाची मांडनी,घरातील कडधान्ये शेतासाठी लागणारे रेनपाईप,कांदे याचे जळुन नुकसान केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.
To Top