बारामती वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी ॲड. सचिन कोकणे यांची बिनविरोध निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वकील संघटनेच्या सन 2024 - 2025 निवडणुकीमध्ये ॲड सचिन शिवाजी कोकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
      बारामती वकील संघ हा जवळपास 1000 वकील संख्या असलेला असून इंदापूर व दौंड तालुक्यातील सत्र न्यायालयाचे खटले देखील बारामती कोर्टामध्ये चालतात. ॲड सचिन कोकणे यांचे सर्व वकील बंधू-भगिनींशी जिव्हाळ्याचे  व मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांची बारामती वकिल संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ॲड सचिन कोकणे हे गेली 10 वर्षापासून बारामती सत्र न्यायालया मध्ये वकिली करत असून कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी वकीली क्षेत्रामध्ये चांगले नावलौकि मिळवीले असून त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून त्यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून  उपाध्यक्ष झाल्यानंतर वकील वर्गाच्या सर्व अडी अडचणी सोडवून त्यांचे  हित व प्रतिष्ठा जपण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ॲड सचिन कोकणे यांनी आमच्या प्रतिनिधींला सांगितले.
To Top