Bhor News l टिटेघर येथे वनवा लागून शेतीच्या पाण्याची पाईपलाईन सह पिकांचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वनवा लागुन शेतीच्या पाण्यासाठी असलेले पाईप लाईनचे पाईप जळाले शेतातील पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणीसह वनवा लावणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.
        चिखलगाव बाजुकडुन ११.३० वाजता वनवा पेटत आला आणी टिटेघर येथील अनिल बबन निगडे या शेतकऱ्यांच्या शेतात गेला यात पाण्यासाठी केलेल्या पाईप लाईनचे पाईप जळुन खाक झाले. शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान झाले तर शेतातील पिकेही जळाले वनवा वेळीच विझवल्यामुळे रोटर यंञ जळता जळता वाचले आणी मोठे नुकसान टळले आहे.
     दरम्यान मगिल आठ दिवासापुर्वी येथील दुसरा शेतकरी तुकाराम गायकवाड यांच्या शेतात वनवा लागुन शेतातील गहु जळाला तर मोटरचा स्टार्टर आणी वायर जळुन नुकसान झाले होते.सतत वनवा लागुन शेतातील पिकांचे कडबा गवताचे पाईपचे नुकसान होते.त्यामुळे शेतात वनवा लावण्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी अनिल निगडे व शेतकरी करीत आहेत. चौकट - गैरसमजुतीमधुन वनवा लावला जातो वनवा लावण्याने पुन्हा चांगले गवत येते या गैरसमजुतीपोटी ग्रामीण भागात वनवा लावला जातो या वनव्यात पशु पक्षी झाडे झुडपे यांच्या सह शेतातील पिके जळुन नष्ठ होतात शेतकऱ्यांना याचा नाहक आर्थिक बुर्दड सोसावा लागतो अनेकदा जिवितहाणी होण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे वनवा लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
To Top