निधन वार्ता l कंठवती संभाजीराव काकडे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी  
 बारामती व पुणेचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या सुविद्य पत्नी कंठावती संभाजीराव काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. 
      आज सकाळी सहा वाजता पुणे येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले ऋतुराज, मेघराज व जयराज सुना नातवंडे असा 
 परिवार आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांच्या त्या चुलती होत. नानासाहेब जगताप यांच्या कन्या कंठावती ताई यांचा जन्म वाणेवाडी, ता. बारामती येथे झाला. त्यांचा विवाह १९६२ साली संभाजीराव काकडे यांच्या बरोबर झाला. संभाजीराव काकडे यांच्या राजकीय करकिर्दीमध्ये कंठावती ताईंनी त्यांना समर्थपणे साथ दिली. कंठावतीताई महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष होत्या. पुण्यातील मतिमंद शाळेसाठी जागा मिळवुण देण्याचे काम कंठावती ताईंनी केले तसेच ती शाळा चालविण्यासाठी आवश्यक ती देणगी मिळवुन "जिवन ज्योत" मतिमंद मुलांची शाळा चालविण्यासाठी मौलाचे सहकार्य केले व शाळेची पुर्नउभारणी केली. त्यांना पृथ्वीराज काकडे, मेघराज काकडे, जयराज काकडे ही तीन मुले असुन सुने नातवंडे असा परिवार आहे.

To Top