सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
समाजात अजूनही परंपरेने पुरुष सत्ताक व्यवस्था कार्यरत आहे. अगदी अंत्यसंस्कार करताना मुलींना अधिकार परंपरेने दिला नाही. पण सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीने प्रज्वलित झालेल्या सुशिक्षित मुलींनी ही प्रथा मोडायला सुरवात केली आहे. नीरा येथेही प्रकाश हिरासकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चार मुलींनी खांदा देत नवा विचार पेरला आहे. मुलगा-मुलगी एक समान हे या मुलींनी दाखवून दिले आहे.
निरा वार्ड नं 3 येथील टेलरिंग व्यवसाय करणारे प्रकाश व्यंकट हिरासकर वय ७३ यांचे दीर्घ आजाराने नुकतेच पुणे येथील दवाखान्यात निधन झाले. प्रकाश हिरासकर हे निरा येथील बाजारपेठेत आपला टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून राजकारण व समाजकारणातही अग्रेसर होते. शुगर चा त्रास असल्याकारणाने त्यांचे दोन्ही डोळे निकामी झाले होते ते निरा परिसरात कडवट शिवसैनिक म्हणून लोकांना परिचित होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासून ते आजतागायत शिवसेनेचेच काम करत होते
त्यांना चारही मुली असून त्यातील तीन मुलींची लग्न झाले असून ते चांगल्या सुस्थितीत आपला प्रपंच करीत आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ सुनील लकडे. यांच्याशी. चर्चा करून वडिलांच्या अंत्यविधीला चारही मुलींनी खांदा देऊन समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केला त्यांच्या पश्चात पत्नी रेखा चार मुली तीन जावई व नातू असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला नीरा येथील मोठा जनसमुदाय उपस्थित होता