भोर l हुकूमशहाच्या ताब्यातून देश सोडवा : शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर : भोरला शिवसेना (उबाठा) गट कार्यकर्ता मेळावा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
समाजातील कुठलाही घटक सुरक्षित नसून दहा वर्षात दिशाभूल केलेल्या केंद्र सरकारने तुमचे आमचे आयुष्य बरबाद होण्याची वेळ आणली आहे.संपूर्ण अनाचाराच्या दिशेने देश चालतोय तुम्ही आम्ही सुरक्षित राहणार कसे.सुरक्षित राहण्यासाठी हुकूमशहा पंतप्रधानांच्या ताब्यातून देश सोडवा असे प्रतिपादन भोर तालुका पश्चिम विभाग शिवसेना कार्यकर्ता मेळावा तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेवेळी शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
           ब भोर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचारसभा मंगळवार दि.३० आयोजित केली होती.यावेळी जिल्हाप्रमुख पुणे शंकर मांडेकर, संपर्कप्रमुख भोर विधानसभा सुनील धाकड, प्रसाद शिंदे, जिल्हा संघटिका संगीता पवळे,कुणाल साळुंखे,भोर तालुकाप्रमुख हनुमंत कंक, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल,शंकर जाधव,विष्णू दानवले,नारायण मोरे,रमेश तुपे, सोपान कंक, अमोल बरदाडे ,अर्जुन चव्हाण,आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेकडोहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
    मिर्लेकर पुढे म्हणाले राज्यातील, देशातील परिस्थिती बदलण्यासाठी,तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच तुम्ही आम्ही सुरक्षित राहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या ४८ खासदारांना निवडून देवून देश वाचवूया.
To Top