सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे
वेल्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुनेत्रा पवारांना पाठींबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन
करण्यात आले होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील मनसेच्या सरपंच,उपसरपंच
ग्रामपंचायत सदस्य व मनसेचे पदाधिकारी यांना त्याच्या गावात विकासकामासाठी भरीव निधी
द्यावा आणि मनसेच्या पदाधिका-यांना चांगली वागणुक द्यावी असा प्रस्ताव सर्वानुमते मांडण्यात
आला होता या प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केला असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष
संतोष दसवडकर दिली.तसेच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीला साथ देण्याच्या
आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगितले.तालुक्यातील सर्व मनसेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार असुन सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी मनसैनिकांनी केला.यावेळी निरिक्षक बाळासाहेब नाटाळ,दत्तात्रय पानसरे,राष्ट्रवादी कॅाग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष किरण राऊत,मनसेचे तालुका
अध्यक्ष दिगंबर चोरघे,जेष्ठ नेते अंकुश दसवडकर,अशोक चोरघे,तानाजी राजीवडे,विनायक लिम्हण,अमोल गायकवाड दत्ता कदम,संतोष चोरघे,रविंद्र घाडगे,विकास भिकुले,दत्ता शेंडकर,संदीप सरपाले,संदीप दिघे,ज्ञानेश्वर भुरूक, धनंजय दसवडकर,राजु झांजे,काका
वालगुडे,विक्रम जगताप,काळुराम जगताप,चंद्रकांत चव्हाण,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते