राजगड l मिनल कांबळे l भाजप सरकारमुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे : शरद पवार ! लेकीच्या प्रचारासाठी २५ वर्षानंतर शरद पवार वेल्ह्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
विरोधकणा खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचे काम भाजप सरकार करत आहे. दिल्लीचे मुखयमंत्री अरविंद केजरीवाल  यांना तुरंगात टाकले. शेतमाल, महागाई यावर न बोलता काँग्रेस , राष्ट्रवादी च्या नेत्यांवर टिका करण्याचे काम देशाचे प्रधानमंत्री करत आहेत
भाजप सरकारमुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
       बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार वेल्ह्यात आले होते. वेल्हे येथील मेंगाई मंदीर मैदानात सभेच्या आयोजन करण्यात आले होते.यावेळी शरद पवार बोलत होते ,बोलताना ते पुढे म्हणाले कि पेट्रोल चा दर वाढवला , घरगुती गॅस महाग केले.
देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी वस्तुस्तिस्थी जनतेला सांगावी.सत्तेचा  गैरवापर ही भाजपची भूमिका आहे
देशाचे प्रश्न समजावेत म्हणून राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत चालत गेले. देशाचा प्रधानमंत्री माझ्यावर टीका करतो.
      महाराष्ट्र मध्ये मी फिरतो  हा माझा अधिकार आहे.ते माझे लोक आहेत.देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारे पंतप्रधानांनी दहा वर्षात किती रोजगार उपलब्ध करुन तरुणांना नोकरीच्या संधी दिल्या,बाहेर गेलेला काळा पैसा भारतात परत आणणार असे सांगितले. होते.किती काळा पैसा भारतात परत आला,यावर देशाचे पंतप्रधान काहीच बोलत नाही केवळ महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे
व शरद पवार यांच्यावर टिका करीत आहेत.
शेतमाल, महागाई यावर न बोलता काँग्रेस , राष्ट्रवादी च्या नेत्यांना शिव्या घालायचे काम देशाचे प्रधानमंत्री करत आहेत.
तालुक्यातील प्रश्नांवर लक्ष घालू लोकसभेला सुप्रिया सुळे विधानसभेला संग्राम थोपटे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा. तसेच आमदार संग्राम थोपटे यावेळी बोलताना म्हणाले  गुंजवणी पाणी प्रश्नाबाबत संघर्ष करत आहे. गुंजवणी धरण संघर्ष समिती
स्थापन करुन लढा सुरु आहे.राज्यात जलसंपदा खाते व उपमुख्यमंत्री ज्याच्याकडे आहे त्यांनी वाजेघर आणि वांगणी परिसरास पाणी मिळाले पाहीजे अशी भाषा करावी,तालुक्यातील प्रशासकीय इमारत देखील याच लोकांनी डावलली,तालुक्यातील महत्त्वाच्या 
विकासकामांना देखील याच लोकांनी अडथळा आणला यावेळी वेल्हेकर त्यांना त्यांची जागा दाखवेल,
तसेच सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या कि महाविकास आघाडीच्या काळात राजगड तालुक्यातील विकासकामांसाठी जास्त निधी आला. राजगड तोरणा या किल्ल्याच्या विकासाठी भरीव निधी दिला असुन काम सुरु आहे,तसेच मढेघाट रस्त्याचे देखील काम सुरु आहे.तालुक्यातील वाड्या, वस्त्यावर वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.अँगणावाडी शाळा वर्गखोल्या अनेक ठिकाणी बांधल्या आहेत.माझी लढाई व्यक्तीगत नसुन कांदा  पिकाला हमीभाव तरुणांना रोजगार, महिलांसाठी, महिलांना काम यासाठी आहे.यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्ष  जगन्नाथ शेवाळे , उद्धव ठाकरे  जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर,रविंद्र मिर्लेकर,राष्ट्रवादी कॅाग्रेस तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे,प्रमोद लोहकरे,प्रदीप मरळ,संतोष रास्ते,मंगेश कोडीतकर,गोरक्ष भुरुक,कॅाग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना राऊत,युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर
उपाध्यक्ष गणेश जागडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,दिनकर धरपाळे,माजी सभापती दिनकर सरपाले,चंद्रकांत शेंडकर,सागर मळेकर,शिवाजी चोरघे,शिवसेनेचे शैलेंद्र वालगुडे,बाळासाहेब देशपांडे,संदीप नगिने,,राष्ट्रवादी कॅाग्रसच्या दुर्गा चोरघे,छाया काळे,सुवर्णा भुरुक,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव भुरुक  यांनी केले .सुत्रसंचालन नाना राऊत यांनी केले तर आभार प्रमोद लोहकरे यांनी मानले

To Top