सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी.
पुरंदर तालुक्यातील निरा येथे निरा बारामती मार्गावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली होती. यामध्ये एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला होता तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन यांनी वेळेवर त्यांना दवाखान्यात पोहोचवण्याचे काम केले होते.
जखमी असलेला तुकाराम सुखदेव माने वय २२ रा निंबुत (आनंद नगर) ता. बारामती या तरुणास पुणे येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. त्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता व मांडी फॅक्चर झाली होती या तरुणाचा काल दि ३० रोजी उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेले इतर दोघेजण ही अत्यवस्थ आहेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे बुवासाहेब ओढ्याच्या ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी व त्याच्या विरुद्ध बाजूला स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी निरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. नुकतेच नीरा मोरगाव मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरती वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याकारणाने या ठिकाणी अपघाताची मालिका चालूच राहणार अशी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.