जावली l विदर्भ मराठवाड्यात महाविकास आघाडीला सर्व जागा मिळतील : राजेश टोपे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
लोकांशी चर्चा करताना अस ऐकल की रामकृष्ण हरि वाजवा तुतारी मग महाराजांच कस होणार तर मान गादीला अन मत तुतारीला अस लोकांनी सांगीतल्याचं ऐकल तर विदर्भाच्या सर्व आणि मराठवाडयाच्या अर्धा निवडूका पार पडल्या आहेत. माझा एक्झीट पोल सांगतो कारण माझे वडील खासदार होते आणि चार सहकार तत्वावर कारखाने आम्ही चालवितो . त्यामुळे त्यांना एक दोन जागा मिळतील बाकी सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास राजेश टोपे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारा सभेमध्ये व्यक्त केला तर सुहास गिरींवर प्रेम करणारा वर्ग प्रचार सभेदरम्यान दिसुन आल्याने सायगाव विभागात अजुनही गिरींचा दबदबा असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
          सायगाव येथिल महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी लोकसभेचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे , माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी जिप सदस्य दिपक पवार, माजी सभापती सुहास गिरी, माजी सभापती सौ. जयश्री गिरी, मोहनराव शिंदे, सिने कलाकार किरण माने , एस.एस. पार्टे गुरुजी, विश्वनाथ धनावडे, शिवाजीराव गायकवाड, सुरेश पार्टे, संदिप माने, सुरेश गायकवाड, तानाजी रांजणे, भरतनाना , नितीन गोळे, समिंद्रा जाधव, रुपाली भिसे आदी उपस्थित होते.
            यावेळी राजेश टोपे पुढे म्हणाले यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे त्यामुळे विचार पूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे पवार साहेब आहेत. शशिकांत शिंदेच्या नावापुढे निष्ठावंत लिहीलेले वाचले परंतु निवडून आल्यानंतर तुमची मते विकून जात असेल तर अशा माणसावर विश्वास ठेवून चालणार नाही असे राजेश टोपे सांगुन निष्ठावंत विरुध्द  गद्दारांची निवडणूक असल्याचे सांगितले.
               यावेळी बोलताना माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आमची ९९ ची बॅच आहे. आमचे मित्र आजचे आमदार आणि उद्याचे खासदार असा उल्लेख करून भाषणास सुरुवात करताच जनतेतुन विजयाच्या घोषणा होवू लागल्या.
              आ. शशिकांत शिंदे म्हणाले हल्ली माझा डीएनए सुद्धा चेक केला जात आहे मी जावलीचा आहे की नाही. प्रतापगड विकायला काढला होता. ताब्यात घेण्याचे शडयंत्र रचले होते. पण ते तेवढेच सांगुन थांबले हे विशेष आहे असे सांगुन पुढे म्हणाले ज्यावेळी ज्यावेळी निवडणुका आल्या  त्यात्या वेळी पाठींबा देण्याचा व बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सदाभाऊंनी आणि मी केला होता.
               ते पुढे म्हणाले राष्ट्रवादीने तिकीट दिले म्हणून ते तिनदा खासदार झाले. केळघरच्या सभेवेळी लोकांनीं बहिस्कार टाकला पण त्यावेळी मी पाया पडलो आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करा असा प्रामाणिक प्रयत्न केला. आज ही आम्हाला छत्रपतींच्या गादीचा अभिमान आहे असे सांगुन ज्यांनी राजकारणात पुढे नेले त्याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे असे आ. शिदे यांनी सांगितले.
            आ. शिंदे म्हणाले मी नेहमी परिक्षा देत असतो सितेने जेवढी दिली नसेल तेवढी देतोय. राम त्यांचा नाही तो आपलापण आहे असे सांगुन अहोरात्र मी कष्ट केल म्हणून १५ वर्षा नंतरही लोकांच तेवढच प्रेम आजही माझ्यावर आहे आज पन्नास खोके मिळाले की लोक लगेच सगळे विसरून जातात असे सांगुन पवार साहेबांच्या पाठींब्याने जिल्हयात दबदबा निर्माण केला. अनेक पदे घेतली माणसे जोडत गेली पण आला खासदारकीची निवडणूक आली आहे संधीच सोन करा आणि आपला माणूस संसदेत पाठवा असे आवाहन आ. शिंदे यांनी केले. 
             आ. शिंदे म्हणाले  सातारा जिल्हा काबीज करण्याचे काम भाजप करीत आहे जर सातारा काबीज केला तर महाराष्ट्राचे गणित बिघडेल म्हणून मला संधी दिली कारण तुमच्या विश्वासावर मी निवडूण येणार याची खात्री आहे असे सांगुन अर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या तपासाच्या नावाखाली आडविल्या गेल्याचा आरोप आ. शिंदे यांनी केला.
            आ. शिंदे पुढे म्हणाले जिल्ह्यात चांगला पाठींबा मिळत आहे. आपणही कोणाच्या भितीला घाबरू नका माणूस वाजविणाऱ्या तुतारीला मतदान करून मोठे लीड द्याल असा विश्वास व्यक्त करतो असे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगीतले.
             यावेळी यावेळी या सरकारने १५ वर्षात एक रुपया महु हातेघर धरणासाठी निधी दिला का अशी विचारणा करून शशिकांत शिंदे यांनी कॅनॉलच्या कामासाठी निधी दिल्याची आठवण माजी आ. सदाशिव सपकाळ यांनी करून दिली.
            यावेळी दिपक पवार यांनी सायगाव विभाग हा तुतारीच्या पाठी असल्याचे चित्र दिसते. निवडवूक काळात उमेदवाराला अटक होतेय अस कधी ऐकलय का? असा प्रश्न करून महागाई किती वाढली याचा पाढा जनतेसमोर वाचला. यावेळी माजी सभापती सुहास गिरी यांनी तुतारी वाजविणारा माणूस पुढील बटण दाबून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
           दरम्यान सुहास गिरी यांच्यावर प्रेम करणारी जनता ही महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेवेळी भर उन्हात मंडपात व मंडपाच्या बाहेर उभी राहुन सभा ऐकत होते.
-------------------
महाविकास आघाडीचे प्रचारात भाजपला लिड दिपक पवार घसरले
सातारा विधानसभेतून जावलीमधून श्रीनिवास पाटलांना कमी लिड मिळल होत पण यावेळी आपल्या तालुक्यातुन १० हजाराच लीड भाजपच्या उमेदवाराला देवु आणि  हे फक्त तुम्हीच करू शकता असे आवाहन दिपक पवार यांनी शिंदे यांच्या प्रचार सभेत करताच पत्रकारांनी चुक निदर्शनास आणुन दिली असता चुक दुरुस्ती करण्याचे सांगितले.

To Top