सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गळीत हंगाम २०२२ - २०२३ मधे सोमेश्वर कारखान्याचे सभासद अशोक भानुदास खोमणे यांचा ऊस मे २०२२ रोजी महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारांमुळे जळीत झाला होता. खोमणे यांनी ऊस जळीत भरपाई मिळण्यासाठी महावितरण कंपनी कडे मागणी केली होती त्यांनी भरपाई मिळण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागपत्रांची पूर्तता केली आणि तब्बल ८८ हजार १०५ रुपयांची भरपाई मिळवली.
खोमणे यांचा २ एकर ऊस जळीत झाला होता त्या वेळी हंगाम सुरू असल्याने त्यांचा ऊस गळीतासाठी कारखान्याने आणला होता.त्यांना कारखान्याकडून सुद्धा जळीत रक्कम वजा करून ऊस बिल देण्यात आले.
खोमणे यांच्या खात्यावर्ती भरपाईची पूर्ण रक्कम ८८,१०५ जमा झाली आहे. आज सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व संचालक ऋषी गायकवाड त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले.
विज भरपाई मिळण्यासाठी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल खोमणे यांनी त्यांचे आभार मानले.
---------------
माझी कर्यक्षेत्रातील सर्व शेतकरी,सभासद बंधूंना विनंती आहे आपला ऊस महावितरन कंपनीच्या वीजवाहक तारांन मुळे जळीत झाल्यास महावितरण कंपनीकडून नुकसाभरपाई मिळण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीने आम्ही भरपाई मिळे पर्यंत सभासदांना सहकार्य करू.
ऋषी गायकवाड
संचालक, सोमेश्वर कारखाना