सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद, कामगार बांधवांनी महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत विजय करण्याचा आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी यावेळी महायुतीचे उमेदवार सुनिता पवार यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या वतीने कामगार मेळावा कार्यस्थळावर शनिवार (दि. ४) रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी जगताप बोलत होते. यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे, संचालक संग्राम सोरटे, प्रणिता खोमणे, सुनील भगत, शैलेश रासकर,लक्ष्मण गोफणे, रमाकांत गायकावाड, यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर देण्याबरोबरच कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कामगारांना चांगला बोन,स्टाफ कॅाटर्स, आरोग्य विमा हे सर्व अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन जगताप यांनी केले.
सोमेश्वर कारखाना गेली अनेक वर्ष सर्वोच्च ऊसदराची किमया पार पाडत असुन यावेळेस देखील आदरणीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऊसदरात पुढे राहू. विरोधक येथे येवुन कारखान्यावर टिका करतात तर त्यांना माझे आव्हान आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो सर्वोच्च ऊसदर आम्ही देत आहोत निदान त्याच्या आसपास तरी त्यांनी येवुन दाखवावे.अजितदादा हे बारामतीचे विकासपुरुष असुन आंम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत याचा अभिमान आहे त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडुन देण्याचे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.