सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावरती खडीचा ढिगारा असल्याकारणाने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काल शनिवारी सकाळी आठच्या सुमारास डांबराची खडी वाहून नेणारा एक डंपर वेगात जात असताना निरेतील बुवासाहेब चौकात त्याचा डंपरचा फाळका निसटला त्यामुळे रस्त्यावर खडी पसरत तो पुढे चालला होता बाजारपेठेतील व्यवसायिकांनी त्याला हटकल्यावरती तो तळवळकर हॉस्पिटल समोर थांबला त्यादरम्यान त्याच्या डंपर मधून मोठ्या प्रमाणावर डांबर मिश्रित खडी पडत होती कसं प्रयत्न त्याने ती खडी पडण्यापासून रोखले व आपले वाहन पुढे घेऊन गेला मात्र आज रविवारी तब्बल 48 तासानंतरही तो खडीचा ढिगारा तशाच अवस्थेत मुख्य बाजारपेठेत असल्याने वाहन चालकांची मोठी तारांबळ होत आहे तर याठिकाणी वरती एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग हा ढीगारा हटवणार का असा प्रश्न बाजारपेठेतील व्यापारी विचारू लागले आहेत याबाबत कालच सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कल्पना देऊनही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचार दौरा असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक हा खडीमिश्रित ढिगारा न काढण्याचे ठरवले असल्याचे समोर येत आहे याबाबत निरा पोलीस दूर क्षेत्रात ही सामाजिक कार्यकर्त्यांनी कल्पना देऊनही काल दिवसभरात व आज सकाळपासून मात्र हा ढिगारा उचलल्याचे कोणीही औदार्य दाखवत नसल्याने सामान्य नागरिक प्रश्न विचारू लागले आहेत की हा ढिगारा आता कोण फोन उचलणार आहे.