राजगड l मिनल कांबळे l ......आणि मी राजगड तालुका दत्तक घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे ;  मिनल कांबळे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारा निमित्त उपमुख्यमंत्रीन अजित पवार वेल्हे या ठिकाणी येऊन सभा घेतली या सभेच्या वेळी, वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या मी राजगड तालुका दत्तक घेणार असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले,
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून सर्व देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेल्या आहे त्यानिमित्त आज प्रचाराचा अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षाकडून सभांचा तडाका सुरू असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे येथील मेंगाई मंदिर मैदानात सभा घेतली, यादरम्यान अजित पवार यांनी वेल्हेकरांवर आश्वासनांची खैरात वाटली, तालुक्यातील महत्त्वाचा मढेघाट रस्त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की या संदर्भात सर्वे पूर्ण झाला असून या रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने येथे अडथळा निर्माण झालेला आहे लवकरच हा अडथळा देखील दूर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, तसेच गुंजवणी धरणाचे पाणी सर्वप्रथम विले आणि भोरकरांना मिळालेच पाहिजे ही देखील आमची आग्रही भूमिका आहे सासवडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः याबाबत सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागेल, तसेच तालुक्यातील पर्यटनासाठी राजगड व तोरणा या किल्ल्याच्या विकासासाठी सर्व्हे करणार असून भरघोस असा निधी देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, गेली पंधरा वर्षे या ठिकाणी आमदार व खासदार काम करीत आहेत
येथील आमदार आणि खासदार करतात तरी काय असा सवाल उपस्थित यावेळी त्यांनी केला लोकांच्या मूलभूत गरजा देखील या लोकांना पूर्ण करता आल्या नाहीत तर त्यांना झोप तरी कशी काय लागते खासदार सुप्रिया सुळे व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली,
आचारसंहिता संपल्यानंतर  येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून येथील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमित्रा पवार यांना साथ द्या म्हणजेच मला साथ द्या मी राजगड तालुका दत्तक घेणार असे आवाहन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवननाथ दारवटकर, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरगे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुनील शेंडकर, विलास पांगारे संदीप खटवड, आप्पा रेणुसे अशोक चोरगे, रवींद्र घाडगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका निर्मला जागडे माजी सभापती गणपत पंडित, अंकुश पासलकर, माजी तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने, महिला अध्यक्षा कीर्ती देशमुख, सुनील राऊत शंकर रेणुसे,गुलाबराव रसाळ, आधी सर्व नागरिक उपस्थित होते

To Top