भोर l संतोष म्हस्के l सत्तेचा गैरवापर करून हुकूमशाही करणाऱ्या गद्दारांना हटवा : खा. शरद पवारसोमेश्वर रिपोर्टर टीम------

Admin
भोर : संतोष म्हस्के
सध्याचे देशातील व राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेसाठी नाही.दोन्ही सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू असून त्या गोष्टी जनता सहन करणार नाही.सत्तेचा गैरवापर करून हुकूमशाही करणाऱ्या गद्दारांना हटवा असे सांगत बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन प्रचाराच्या सांगता सभेत यावेळी उपस्थितांना केले.
    भोर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रविवार दि.५ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले भोर,वेल्हा,मुळशीतील जनतेचा सुप्रिया सुळे यांना पूर्ण पाठिंबा आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मावळे इतिहास रचतील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मंत्री अनिल देशमुख,सुनील केदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार वजारद मिर्जा,आमदार संग्राम थोपटे,अशोक मोहोळ,नाना नवले,जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,रवींद्र बांदल, पृथ्वीराज थोपटे, लहूनाना शेलार,विठ्ठल आवाळे,विठ्ठल शिंदे, अनिल सावले,सतीश चव्हाण गणेश खुटवड,माउली शिंदे आदींसह हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
     यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले पंजा व तुतारीची जोडी मजबूत करून मोदी सरकारला धडा शिकवा देशाला कर्जबाजारी करणाऱ्यांना घरी घालवा.तर माजी मंत्री सुनील केदार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा जोपासून स्वाभिमानाने जगा,मराठी बाण्याचा अपमान सहन करून घेवू नका.तसेच मावळ्यांनो देशातील सर्वसामान्यांची निवडणूक असल्याने केंद्रातील सरकार खाली खेचून परिवर्तनाचे शिलेदार व्हा असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

To Top