सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर ,वेल्हा,मुळशी तालुक्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे आणि पुढील काळात राहणार असून विकासासाठी काही पण करून एकदा संधी देऊन बघा.वारेमाप आश्वासने देणाऱ्यांना जागा दाखवून केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून द्या.असे प्रतिपादन भोर येथील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रविवार दि.५ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आमदार सुनील शेळके,आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा बँके संचालक भालचंद्र जगताप ,माजी जि. प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, कुलदीप कोंडे, बाळासाहेब गरुड ,सचिन मांडके ,केदार देशपांडे ,समीर घोडेकर ,शरद ढमाले ,अमर बुदगुडे, दिपाली शेटे ,नितीन सोनावले, राजेंद्र गुरव ,जीवन कोंडे,रोहन भोसले आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले काही लोक प्रतिनिधींना मला ओळखता आले नसल्याने त्यांनी माझ्यावर १५ वर्ष काय केले अशी वलग्ना करत माझ्यावर टीका केली. तुम्ही महाविकास आघाडी पक्षाच्या सत्तेत असताना भोर विधान सभेच्या विकास कामाबाबत एकदा ही फाईल घेऊन आला नाही.उलट मी कोणताही भेदभाव न करता कोट्यावधीचा निधी तुम्हाला दिला. भोरला रोजगार नसल्यामुळे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी का होत असल्याचे त्यांनी जाणून घ्यावे.१५ वर्ष तालुका विकासापासून वंचित राहत गेला.याला जबाबदार आपण आहात.मी बोलतो तसा वागतो. चूक असेल तर ती मान्य करतो. विकास कामे कशी करायची हे मला शिकवण्याची गरज नाही. सर्वांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे गरजेचे होते.असा खोचक सल्ला आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता उपमुख्यमंञी अजित पवार यांनी दिला.