बारामती लोकसभा निवडणुकीसाठी भोर तालुक्यात ५६१ मतदान केंद्रांवर होणार मतदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदान होणार असून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोर विधानसभा मतदारसंघातील भोर,वेल्हा(राजगड),मुळशी तालुक्यातील ४ लाख ७ हजार ९२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
             भोर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून १३२० अधिकारी,कर्मचारी यांची २४० पथके मतदान केंद्रांकडे रवाना करण्याचे काम सुरू झाले आहे.तर २४ पथके राखीव ठेवणत आल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.मंगळवार दि.७ मतदान होणार असल्याने भोर आयटीआय येथे सोमवार दि .६ कर्मचारी, अधिकारी मतदान मशीन तसेच मतदान केंद्रावर लागणारे इतर साहित्य तपासून घेण्यात मग्न झाले असून नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत.भोर तालुक्यात १ लाख ६२ हजार २५२ मतदार , मुळशीत १  लाख ९३ हजार ७०६ मतदार असून वेल्हा(राजगड) तालुक्यात ५१ हजार ९६२ मतदार आहेत.

To Top