सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बारामती लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेतील मतदानासाठी भोर शहरासह ग्रामीण भागात मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदार गर्दी करून उत्स्फूर्तपणे शांततेत मतदान करीत असल्याचे चित्र आहे.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदार सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांशी बुजुर्ग मतदार मतदानासाठी मतदार केंद्रांवर जात असल्याने भोर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पहिल्या टप्प्यात २०३ भोर विधानसभा मतदारसंघात ८ टक्के मतदान झाले.