सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-शिरवळ मार्गावरील राजेवाडी ता. खंडाळा च्या चडाला शिरवळ बाजूकडे जाताना ओमनी चारचाकी चालू वाहनावर वडाचे झाड कोसळले.झाड गाडीवर मधोमध पडल्याने गाडी चालवणारा चालक व शेजारी बसलेला प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले असल्याची घटना गुरुवार दि.९ घडली.
ओमनी चारचाकी एमएच १४ ए.एम.३३७४ ही गाडी शिरवळ बाजूला जात असताना ही घटना घडली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र गाडीतील दोघेही बचावले.