Bhor News l पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे ता.भोर येथे  गुरुवारी दि.९ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका महिलेच्या अंगावरून डंपर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सोनाली महेश साठे रा. सांगली) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.तसेच त्यांचे पती महेश बाळू साठे रा. सांगली हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 
      याबाबत अधिक माहिती सांगली येथील महेश साठे व त्यांची पत्नी सोनाली साठे हे होंडा कंपनीच्या ॲक्टीवा एम एच १० डी यू ७५५९ या दुचाकीवरून पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले असताना त्यांच्या दुचाकीला शिवरे गावच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील हॉटेल तृप्ती समोर भरधाव वेगाने चाललेल्या डंपर ने मागून धक्का दिला. या धक्क्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या महेश साठे यांचे नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्यावर आदळली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या सोनाली साठे या खाली पडल्या आणि त्याच वेळेस भरधाव वेगात असणारा डंपर या महिलेच्या अंगावरून गेल्याने त्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस व महामार्ग पोलिस घटनस्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे.सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
To Top