Bhor News l 'या' कालावधीत आंबाडखिंड घाट रस्ता महिनाभरासाठी बंद : बांधकाम विभागाची माहिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे ते मांढरदेवी घाट रस्त्याचे काम सुरू असल्याने बुधवार दि.१ पासून पुढील २० ते २५ दिवस आंबाडखिंड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांनी दिली.
     राज्याचे कुलदैवत असणाऱ्या मांढरदेवी गडावरील काळुबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यातील भाविक-भक्त येत असतात.सध्या आंबाडे ते मांढरदेवी पर्यंतचा घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालक तसेच प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच रस्त्याच्या कामाला वाहनांचा अडथळा निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.तरी भावीक भक्तांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असेही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग पुणे यांनी सांगितले.
To Top