भोर l शैक्षणिक कामकाजात सर्वांना सामान न्याय देणारे प्राचार्य रमेश बुदगुडे : माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
सकारात्मक विचारसरणी ठेवून समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्य हाती घेऊन जिद्द तळमळीने कार्य करणारे, प्रत्येक शिक्षकातील कला गुण ओळखून त्यांना विशिष्ट वेळेत विशिष्ट न्याय देणारे, कार्यालयीन कामकाजात सर्वांना समान सामान्य न्याय देवून उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे आदर्श प्राचार्य म्हणून रमेश बुदगुडे यांची राज्यात ओळख आहे असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार पुणे विभाग दत्तात्रय सामंत यांनी केले.
      सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व जुनिअर कॉलेज खानापूर ता.भोर येथील प्राचार्य रमेश ज्ञानोबा बुदगुडे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याप्रसंगी माजी शिक्षक आमदार पुणे विभाग दत्तात्रय सावंत मंगळवार दि .३१ बोलत होते.यावेळी प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सुरेश उमाप ,रोहिदास उंद्रेपाटील,जि.प.अध्यक्ष सातारा उदय कबुले ,राजेंद्र तांबे ,नामदेव सेंडकर,रामचंद्र थोपटे, दत्तात्रय चव्हाण ,तानाजी थोपटे, विठ्ठल आवाळे, गीतांजली शेटे , आनंदा आंबवले, उत्तम थोपटे,सुवर्णा मळेकर, पंढरीनाथ भिलारे ,अनिल सावले,भाबवडी सरपंच अमर बुदगुडे ,माजी सरपंच महादेव बुदगुडे, शिवाजी बुदगुडे ,रामचंद्र बुदगुडे आदींसह वीसगाव पंचक्रोशीतील शेकडोहून अधिक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी रमेश बुदगुडे यांना सेवापूर्ती गौरव सोहळ्याप्रसंगी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
   
To Top