Bhor News l उत्रोलीला आरक्षित जागेवर लवकरच उद्योग उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात अनेक बेरोजगार तरुण पडून आहेत.त्यांच्या हाताला काम नाही.रोजगार निर्मिती होण्यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे असतानाही उद्योग नाहीत.औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला तात्काळ देण्यात येतील.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावून उत्रोली ता.भोर  येथे आरक्षित जागेवर औद्योगिक वसाहत उभारणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
     बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या प्रचारार्थ बुधवार दि.१ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसरापूर येथे बोलत होते.तर अजित पवार यांनी मागील काळातील खासदार व विद्यमान आमदार यांनी भोर-वेल्हा-मुळशीचा विकास केलाचा नाही. पुढील काळात पिंपरी चिंचवड आणि बारामतीचा केलेला विकास या धर्तीवर भोर,वेल्हा,मुळशीचे रूप विकास कामांच्या माध्यमातून बदलून टाकणार असल्याचे सांगितले.यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे,निल्हम गोऱ्हे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,रणजीत शिवतरे,कुलदीप कोंडे,विक्रम खुटवड,चंद्रकांत बाठे,बाळासाहेब चांदेरे,सचिन मांडके,जीवन कोंडे,रमेश कोंडे,अमोल पांगारे,शरद ढमाले आदींसह भाजपा, शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 
     मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले ही निवडणूक नातेगोत्याची नाही ,परिवार वादाची नाही ,देशाच्या विकासाची निवडणूक आहे.कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.बारामती लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अजितदादांनी विकास केलेला आहे आणि पुढील काळातही करणार आहेत.

To Top