पुरंदर l शेेतकरी हिताची भुमिका घेणाऱ्या घटकांच्या हातात सत्ता देण्याची गरज : खा. शरद पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
मी अनेक प्रधानमंञी पाहिले. केंद्रातही काम केले. गरीब जनतेसाठी इंदिरा गांधींनी  काम केले.परंतु सद्याच्या प्रधानमंञी मोदी यांचे धोरण पिकवणा-या शेतक-यांना  नाहीतर खाणा-यांना महत्व देणारे आहे.  यात बदल घडविण्यासाठी देश व राज्य शेेतकरी हिताची भुमिका घेणारे अशा घटकांच्या हातात दिलं पाहिजे . याकरिता लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांना 
मतदान करा असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.

    बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी ( दि.२) दुपारी चार वाजता निरा ( ता.पुरंदर) येथे खा. शरद पवार यांची जाहीर सभा झाली . यावेळी पदयाञाही काढण्यात आली.
       यावेळी खा.सुप्रिया सुळे, आ. संजय जगताप, 
रोहित पाटील ,  जगन्नाथ शेवाळे , संभाजीराव झेंडे, सुदामराव इंगळे,  विजय कोलते, माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, हाजी सोहेल खान, सक्षणा सलगर, गौरी कुंजीर, सुनिता कोलते यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक  मान्यवर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बापुसाहेब पवार या अपक्ष उमेदवाराने खा. सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला.
          खा. पवार पुढे म्हणाले की,  लोकसभेत ५४४ खासदारांत  शेतक-यांविषयीचे सर्वात जास्त प्रश्न, सर्वात जास्त काम केल्यामुळे खा.सुप्रिया सुळे यांचा देशात दुसरा नंबर लागला. याकरिता खा.सुळे यांना प्रोत्साहित करण्यासाठी खा. सुपिया सुळे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे . जे प्रश्न आहेत ते निवडणूकीनंतर सोडविले जातील.

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या  की, केंद्र सरकारने इथेनॉलचे धोरण बदलले. त्यामुळे देशातील  ऊस उत्पादक शेतक-यांचा तीन हजार कोटी रूपयांचा तोटा झाला. त्यामुळे सोमेश्वरच्या सभासदांना प्रतिटन ३०० रूपये कमीभाव मिळाला. महाराष्ट्राच्या व शेतक-यांच्या विरोधात धोरण करणार असतील तर त्या दिल्लीच्या  तक्ता विरोधात ताकतीने लढणार आहे. याकरिता भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली.

रोहित पाटील म्हणाले की, स्व.आर.आर पाटील यांच्या कार्यकाळात ६५ हजार मुले पोलिस झाले. 
आज भरती वेळेवर होत नाही. भरती झाली तर निकाल लागत नाही.याकरिता कायदाकरण्यासाठी संघर्ष केला तर अटक केली जाते.याकरिता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या.

आ. संजय जगताप म्हणाले की, शरद पवार 
केंद्रीय कृषी मंञी असताना सर्वसामान्य शेतक-यांची ७२हजार कोटी पेक्षा जास्त कर्जमाफी   केली. आत्ताचे सरकारने कर्जमाफी  करताना अनेक कायदे करून काहींना कर्जमाफी मिळाली तर काहींना कर्जमाफी मिळाली नाही. कांद्याच्या व शेतीमालाच्या दराबाबत सर्वजन कंटाळलो आहोत.  अब की बार ४०० पारचा  नारा दिला आहे तो आपल्या मतदानाचा अधिकार घास पण्यासाठी
आहे.याकरिता सर्वांनी सक्षमपणे खा.सुळेंना निवडून द्यावे.

प्रास्ताविक दत्ताजीराव चव्हाण यांनी केले तर आभार संदीप धायगुडे यांनी मानले. 
-------------------------------------------------------------
महाविकास आघाडी ग्रामपंचायत ते लोकसभा ताकतीने लढणार - खा.सुळे
बँक व कारखाना कोणाचीही मक्तेदारी नाही.
जिल्हा बँक, साखर कारखाने तसेच ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका या पुढे महाविकास आघाडी पुर्ण ताकतीने लढणार आहे.  यंदा तर पहिल्यांदाच शाळेच्या व बँकेच्या  लोकांना निवडणूकीचे काम करावयास लावण्यात आले आहे. असे चुकीचे राजकारण मोडून काढू 

To Top