Purandar Breaking l गावात यात्रेचा छबिना..चोरट्यांनी डाव साधत तब्बल तीन लाख तीस हजाराचा ऐवज केला लंपास : पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथे यात्रेच्या दिवशी सशस्त्र चोरट्यांनी  घरात घुसून.जबरी चोरी केली आहे. यामध्ये तीन लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरीला गेला असल्याची फिर्याद जेजुरी पोलिसात देण्यात आली आहे.
      यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक २ मे रोजी या संदर्भातील फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दिनांक एक मे च्या रात्री गावामध्ये जत्रा असल्याने मंदिरात छबिना  चालू होता. त्यामुळे गावातील बहुतांश लोक छबिण्या मध्ये व्यस्त  होते. त्याचवेळी या चोरांनी संधी साधून घरामध्ये झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दागिने चोरून नेले आहेत. उन्हाळा असल्या कारणाने दरवाजा उघडा ठेवून हे लोक झोपले होते. यामध्ये रात्रीच्या वेळी चोरांनी घरात प्रवेश करून ही चोरी केली. हे आलेले चोर हातात शस्त्र घेऊन आले होते. यातील एक शस्त्र चोरी करताना तिथेच पडले आहे .ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
       यामध्ये ऋतुजा श्रीकांत धायगुडे  हिच्या गळ्यातील १ लक्ष ८० हजार रुपयाचे सोन्याचे साडेचार तोळा वजनाचे गंठण ६० हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण  १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ८० हजार रुपये बिमातीचे  काळया मण्यात गुफलेले सोन्याचे गंठण असा  ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी शितल माणिकराव  चोरमले  यांनी  दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील अधिकच तपास पो.कॉ. केशव जगताप करीत आहेत.
To Top